नमस्कार,

आपल्या सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

प.पू.आईने (ताईंनी) समाधी (महानिर्वाण) घेतल्याला २१ वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही अनेक कृष्णभक्त आईने/कृष्णाने सांगितल्याप्रमाणे उपासना, साधना करत आहेत. कृष्ण केंद्रात उपस्थित राहून, कृष्णकृपेचा लाभ घेत आहेत. त्या सर्वांच्या आग्रहावरून 'श्रीकृष्ण लीलावली' ह्या श्रीकृष्ण अनुभूतीं च्या ग्रंथाचा भाग दुसरा काढावा असा विचार केला आहे.

तरी सर्व कृष्ण भक्तांना नम्र विनंती, की त्यांनी त्यांचे अनुभव, प्रचिती लिहून नेमक्या व कमीत कमी शब्दात लवकरात लवकर कृष्ण कुटीर मध्ये किंवा आपापल्या ग्रुप लीडर्स कडे (ठिकाणा नुसार आता आपले सात ग्रुप आहेत आणि सात ग्रुप लीडर्स आहेत) पाठवावेत. कृष्ण भक्तांच्या प्रतिसादानुसार पुढील लिखाणा बाबत निर्णय घेता येईल. २९ मे २०२४ प.पू. आईचा ९० वा वाढदिवस, ह्या वर्ष भरात आपण भरभरून प्रतिसाद द्याल अशी खात्री वाटते.

२९ मे ला भेट होईलच!

मनःपूर्वक धन्यवाद
कृष्ण कुटीर परिवार

या फॉर्मद्वारे तुमचे अनुभव पाठवण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 



प.पू.ताईंना कोटी कोटी प्रणाम

गुरुमाऊली दे बुद्धी मज। सर्वस्व हे तुम्हीच ना।
निजभक्ता मनी बोध सांगूनी। सदा रक्षिले तुम्हीच ना ॥धृ.॥
गुरुमाऊली विनवितो तुम्हां। सांभाळावेही तुम्हीच ना।
निजभक्ता मनी बोध सांगूनी। सदा रक्षिले तुम्हीच ना ॥१॥
शिवशक्ती अन् वासुदेवही। मंत्रा गुंफिले तुम्हीच ना।
जपा लावूनी, मोजीत बसले। भक्तांसाठी तुम्हीच ना ॥२॥
अज्ञातशक्ती, महानशक्ती। आदिशक्ती ही तुम्हीच ना।
विश्वजननी अन् गुरुमाऊली। एके ठायी तुम्हीच ना ॥३॥
कर्तव्यासी कधी न सोडिले। प्रेमे साधिले तुम्हीच ना ।
आधी केले मग सांगितले। आर्दश आधार तुम्हीच ना ॥४॥
विविध उपाये, विविध औषधी। भक्ता रक्षिले तुम्हीच ना ।
अनेक रूपे, अनेक सत्ये। सदा साहिली तुम्हीच ना ॥५॥
भक्तांसाठी सोस काढीला। नकळत तारिले तुम्हीच ना ।
गोड परि ठोक आदेश मनात। ठसविला तो तुम्हीच ना ॥६॥
समाधान अन् आनंदाची। मूर्त कल्पना तुम्हीच ना ।
दुःख मेरु हे क्षणात फोडिले। भक्तांसाठी तुम्हीच ना ॥७॥
भक्त, कार्य अन् प्रेम भावना। या परि सत्व काहीच ना ।
उचलूनी अमुची संकट मात्रे। सर्व सोशीले ते तुम्हीच ना ॥८॥

जगद् व्यापका, जगद्धोधारा। जगद् गुरो श्रीकृष्णा ।
ताई बाय अन् आई मॉम हे। कृष्णरूपी तुम्हीच ना ॥९॥
गुरुमाऊली दे बुद्धी मज। सर्वस्व हे तुम्हीच ना ।
निजभक्ता मनी ओळख दावी। भ्रमा नाशिले तुम्हीच ना ॥१०॥
भक्तइच्छा ठेऊनी स्मरणि। योजिले कार्या तुम्हीच ना ।
पुरविली आस युगायुगांची। पुनीत केले परदेशा ॥११॥
स्थापन करण्या विश्वजननी। सुदिन मुहूर्त काळवेळ ती तुम्हीच ना।
निजभक्ता मनी बोध सांगूनी। सदा रक्षिले तुम्हीच ना ॥१२॥
अखंड यात्रा विश्वासाची। श्रद्धा कार्या तवचरणा ।
सदा अर्पिले निरपेक्षी तू। काया, वाचा आणि मना ॥१३॥
अखंड चाले ध्यान अंतरी। महानशक्ती पर ब्रह्मा ।
मायाधिपती पंचमहाभूता। कवेत ठेविले तुम्हीच ना ॥१४॥
भक्तवत्सला भक्तरक्षका। द्वारकाधीशा तुम्हीच ना ।
निजभक्ता मनी बोध सांगूनी। सदा रक्षिले तुम्हीच ना ॥१५॥
अज्ञातासी ज्ञात केले। घडवूनी सारे तुम्हीच ना ।
निजभक्ता मनी बोध सांगूनी। सदा रक्षिले तुम्हीच ना ॥१६॥
कृष्णभावना या भवसागरी। जागृत केली तुम्हीच ना ।
निजभक्ता मनी बोध सांगूनी। सदा रक्षिले तुम्हीच ना ॥१७॥

श्रीकृष्णार्पणमस्तु

॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ॥

॥ ॐ महान शक्ती देवताय नम: ॥

॥ गुरु माऊलीचा जयजयकार असो ॥

॥ श्री कृष्ण संदेश ॥


मी काळाप्रमाणे बदलतो. आजच्या काळात प्रेमाची, आपुलकीची, भक्तीची, श्रद्धेची व कर्तव्याची फारच गरज आहे. कर्तव्यामध्ये मला पहा, प्रेमाने मला जिंका, श्रद्धेने मला आपलासा करून घ्या, विश्वासाने माझ्याजवळ या. या तत्वांचा उपयोग केला तर ओंकाराची जागृती व्हायला फारच मदत होणार आहे.

माझा मदतीचा हात आपल्याला लाभावा असे वाटत असेल तर श्रद्धेला व विश्वासाला तडा जाऊ देऊ नका.

माझा कृपाशीर्वाद पाहिजे असेल तर कर्तव्याला विसरू नका आणि कर्तव्य करीत असताना प्रेमाने करा, म्हणजे माझा कृपाशिर्वाद सतत आपणास मिळत राहील .

या वरील सर्व गोष्टीतच मी आहे. याची पूर्ण जाणीव ठेवा; म्हणजेच तुम्हाला तुमच्यातील ओंकाराची जाणीव होईल.

Shri Krishna Sandesh


I change according to the times. Love, affinity, devotion, faith and sense of duty are the dire needs of today. You should see Me in your duty. Conquer Me with love. Draw Me towards you by virtue of unflinching faith. Come close to Me through belief.

If you practise these precepts, it will be of great help for you, to awaken in the eternal - the "AUMKARA!"
Let not your faith and belief suffer a crack. If you desire My helping hand, let not your sense of duty be ever neglected.

If you desire My blessings, do your duty with love. It will then bring to you My favour and blessings. Do remember fully and consciously that I manifest Myself in all what has been said above.

And then... You will be conscious with the "AUMKARA" in you!

Check out our Library

Books

Click to view all the books.

Audios & Videos

Click to view all the audios & videos.

Photos

Click to view all the photos.

Shri Krishna Leela Centers

Click to view the center list

|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।